Home क्राईम पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल !

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल !

0
125

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील माहेर असलेल्या विवाहितेला सासारी मोरगाव येथे हुंड्याचे पाच लाख रूपये आणावे व लग्न जमविणाऱ्यांनी खोटे बोलून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रविवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील माहेर असलेल्या निकिता स्वप्नील पाटील वय २३ यांचा विवाह रावेर तालुक्यातील मोरगाव येथील स्वप्नील विनोद पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही दिवसातच पती स्वप्निल पाटील हा दारू पिऊन घरात भांडण करायला सुरूवात केली. त्यानंतर माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान स्वप्निलचे या आधी दोन लग्न होवून घटस्फोट झाल्याचे विवाहितेला समजल्यानंतर त्यांनी लग्न जमविणाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी महिलेला शिवीगाळ करत आम्हाला फोन आणि संपर्क करू नये अशी धमकी दिली. दरम्यान विवाहितेने याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती स्वप्नील विनोद पाटील रा. मोरगाव ता.रावेर, पतीची आजी सुनंदाबाई बाबुराव जाधव, मावसा आजा बाबुराव सिताराम जाधव, मावस मामा युवराज बाबुराव जाधव, मावस मामी रूपाली युवराज जाधव सर्व राहणार खानापूर ता. रावेर, मावशी सुनिता किसन पाटील रा. कुसुंबा जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound