Home क्राईम विवाहितेचा सासरी पैशांसाठी छळ; पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेचा सासरी पैशांसाठी छळ; पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टेलिफोन नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे पैशांसाठी शिवीगाळ व मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गुरुवारी ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील टेलिफोन नगरातील माहेर असलेल्या प्रीती रोशन जैन वय-३८ यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रोशन केवलचंद जैन यांच्याशी २००७ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान काही वर्षे संसार सुखाचा चालू असताना सासरच्या मंडळींनी विवाहितेला माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही. या रागातून पतीसह सासू आणि नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ केले. तसेच पती यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती रोशन केवलचंद जैन, सासु वंदनाबाई केवलचंद जैन, नातेवाईक अनिता प्रकाश बाफना, सुनिता सुनील चोपडा सर्व रा. साक्री जि. धुळे यांच्या विरोधात गुरुवार ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound