तांबापूरा येथील विवाहितेला पाच लाखांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा येथील माहेर असलेल्या विवाहितेला शेती घेण्यासाठी माहेराहून ५ लाख रुपये आणावे, यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकारसमोर आला आहे. या संदर्भात शुक्रवारी २७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापुर परिसरातील माहेर असलेल्या फरहाना परवीन मुस्ताक खान (वय-२०) यांचा विवाह जळगाव शहरातीलच गेंदलाल मिल येथील मुस्ताक खान आसिफ खान यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्याच्या दोन महिन्यानंतर पती मुश्ताक खान याने विवाहितेला शेती घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हालाखीचे असल्यामुळे त्यांनी पैसे आणले नाही. या कारणावरून पती मुश्ताक खान याने पत्नीला शिवीगाळ करत छळ केला. शिवाय सासु, सासरे यांनी देखील पैशांसाठी त्रास दिला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी तांबापूरा येथे निघून आल्या. दरम्यान शुक्रवारी गुरुवारी २७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मुस्ताक खान आसिफ खान, सासू रेहानाबी आसिफ खान आणि सासरे आसिफ खान यासीन खान सर्व रा. गेंदालाल मिल, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.

Protected Content