ज्ञानदेव नगरात विवाहितेनं संपविली जीवनयात्रा; कारण अस्पष्ट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ज्ञानदेव नगरात राहणाऱ्या रुपाली मनोहर महाजन (वय ३२) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील ज्ञानदेव नगरात रुपाली महाजन या विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी विवाहितेच्या कुटुंंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content