पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री येथील ४० वर्षीय विवाहितेचा शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पिंप्री येथील विवाहिता आपल्या कुटुंबियासह राहते. गावातील संशयित आरोपी गुलाब जगन्नाथ पाटील रा. पिंप्री ता. पारोळा हा २१ जून रोजी महिला एकटी घरात असतांना अश्लिल हावभाव करून अंगलट करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता महिलेला शिवीगाळ करून अश्लिल हावभाव करत विनयभंग केला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश जाधव करीत आहे.