जळगाव प्रतिनिधी । माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या पतीसह इतर सात जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मैत्री शुभकर सपकाळे (वय-२०) रा. खान्देश मिल जळगाव यांचा विवाह वरणगाव फॅक्टरी येथील शुभकर प्रभाकर सपकाळे यांच्याशी जुन २०२० मध्ये लग्न झाले. सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर माहेरी जावून वडीलांकडून १० लाख रूपये घेवून ये असे सांगून पती शुभकर हा मोरझोड करू लागला. तसेच पैसे आणले तर घरात ये असे सांगून विवाहितेला घराबाहेर काढले. याला कंटाळून विवाहिता जळगाव येथे आईवडीलांकडे माहेरी निघून आल्यात. विवाहितेने मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती शुभकर प्रभाकर सापकाळे, सासू मंजूळा प्रभाकर सपकाळे, जेठ प्रशांत प्रभाकर सपकाळे, जेठानी ज्योती प्रशांत सपकाळे, ननंद माधुरी उल्हास बिऱ्हाडे, नंदोई उल्हास पाव्हणू बिऱ्हाडे सर्व रा. वरणगाव ता. भुसावळ आणि ननंदची ननंद उज्वला प्रकाश तायडे रा. पिंप्राळा यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.