घर घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील माहेर असलेल्या २३ वर्षीय विवाहितेला घर घेण्यासाठी १५ लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नयन चारुदत्त शर्मा (वय-२३) रा. शेगाव जि.बुलढाणा ह.मु. एमआयडीसी जळगाव यांचा विवाह २९ जून २०२० रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील चारुदत्त नंदकिशोर शर्मा यांच्याशी झाला. सुरुवातीचे नऊ महिने चांगले गेले, त्यानंतर पती चारुदत्त शर्मा यांनी घर घेण्यासाठी माहेरुन विवाहितेने १५ लाख रुपये आणावे यासाठी दारू पिऊन विवाहितेला शिवीगाळ करत होते. यासाठी सासू आणि सासरे यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे पती पुन्हा मारहाण करून गांजपाठ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता नयन शर्मा ह्या जळगाव येथील माहेरी निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून बुधवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती चारुदत्त शर्मा सासू कमला नंदकिशोर शर्मा आणि सासरे नंदकिशोर रामदेव शर्मा सर्व रा. शेगाव ता.बुलढाणा यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

 

Protected Content