जळगाव प्रतिनिधी । व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी जळगाव येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या सोनवद येथील पतीसह सात जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील आव्हाणे शिवारातील रेणूका नगरातील माहेर असलेल्या दिपाली जितेंद्र पांडे (वय-३२) यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील जितेंद्र भगीरथ पांड यांच्याशी २००९ मध्ये झाला. लग्न झाल्यापासून वेळोवळी पती यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहितेने माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. दरम्यान, दोन्ही कुटुंबियांची मध्यस्थी होवून वाट मिटविण्याचा प्रयत्नही केला. परंतू सासरे भगिरथ पन्नालाल पांडे, सासू लिलाबाई भगीरथ पांडे, जेठ मयूर भगिरथ पांडे, जेठानी मनिषा मयुर पांडे, जेठ नितीन भगीरथ पांडे, जेठाणी वंदना नितीन पांडे सर्व रा. सोनवद ता. धरणगाव यांनी सतत टोमणे मारत शिवीगाळ करत होते. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिते जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीष हारनोळ करीत आहे.