पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आझाद चौकातील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून सोन्याची चैन व घर भाड्याने घेण्यासाठी १ लाख रूपये आणावे, यासाठी छळ करणाऱ्या पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील आझाद चौक परिसरातील माहेर असलेल्या रूपाली एकनाथ चौधरी यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील भडणे येथील एकनाथ भिका चौधरी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्या नंतर पती एकनाथ चौधरी याने विवाहितेला माहेरहून सोन्याच्या चैनसाठी ५० हजार आणि घर भाङयाने घेण्यासाठी ५० हजार असे एकुण १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केला आहे. या छळाला कंटाळून विवाहिता पारोळा येथे माहेरी निघून आल्या. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात पती एकनाथा भिका चौधरी, सासू लता भिका चौधरी, सासरे भिका मोतीराम चौधरी, दिर कम्लेश भिका चौधरी, धर्मा मोतीराम चौधरी सर्व रा. भडणे ता. शिंदखेडा जि. धुळे, आशाबाई रविंद्र चौधरी आणि रविंद्र बारकु चौधरी दोन्ही रा. वाघ नगर जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहे.