लग्नात मानपान न दिल्याने विवाहितेचा छळ; भडगाव पोलीसात गुन्हा

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोरटेक बुद येथील माहेर आलेल्या विवाहितेला मुलगी झाली आणि लग्नात मानपान दिला नाही आणि माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी गांजपाठ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोरटेक येथील माहेर असलेल्या मनीषा यशवंत पाटील यांचा विवाह 2016 मध्ये चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील यशवंत भाऊसाहेब पाटील यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्याच्या ४ महिन्यापर्यंत विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करणे, टोमणे मारणे सुरु झाले. तसेच लग्नात तुझ्या आई-वडिलांनी मानपान दिला नाही, तुला मुलगी झाली आणि तुझ्या वडिलांनी लग्नात अंगावर कमी सोने चढवले असे बोलून विवाहितेला तीन लाख रुपये आणावे अशी मागणी पती यशवंत पाटील याने केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पती, सासू, सासरे नणंद आणि नंदोई यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच गावचा पोलीस पाटील असल्याचे धमकावून मला कोणीच काही करू शकत नाही अशी धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे माहेरी निघून आल्या. याप्रकरणी भडगाव पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती यशवंत भाऊसाहेब पाटील, सासू सुशिलाबाई भाऊसाहेब पाटील, सासरे भाऊसाहेब भिकन पाटील, नणंद वैशाली पाटील, नंदोई योगेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत आहे.

Protected Content