जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैश्यांसाठी छळ करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा रोडवरील भिकमचंद जैन नगरात माहेर असलेल्या ऐश्वर्या रोहन पाटील (वय-२४) यांचा पुण्यातील कात्रज येथील रोहन राजकुमार पाटील यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती रोहन याने लहान लहान गोष्टींवरून टोमणे मारने सुरू केले. त्यानंतर विवाहितेने माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. पैश्यांची पुर्तता विवाहिने न केल्यामुळे पती रोहन, सासू व नणंद यांनी गांजपाठ करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तर पती रोहन याने विवाहितेला घरातून हाकलून दिले. विवाहिता माहेरी जळगाव येथील भिकमचंद जैन नगर येथे माहेरी निघून आल्या. शनिवार १२ मार्च रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रोहन राजकुमार पाटील, सासू शारदा राजकुमार पाटील, आणि नणंद जागृती राजकुमार पाटील सर्व रा. कात्रज, पुणे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगिता खांडोरे करीत आहे.