यावल प्रतिनिधी । नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे, यासाठी यावल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, माधुरी भुषण फुसे (वय-२८) रा. नेहरू नगर, रामानंद नगरजवळ ह.मु. मेन रोड यावल यांचा विवाह जळगाव येथील भुषण यशवंत फुसे यांच्याशी ३० मार्च २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच पती भुषण यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर पती भुषण याला नोकरी लागण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी मारझोड करण्यास सुरूवात केली. लग्नाला वर्ष झाल्यानंतर मुलबाळ होत नाही म्हणून सासरे यशवंत फकीरा फुसे, सासु सुमित्रा यशवंत फुसे, ननंद पुनम हितेंद्र असवाल आणि नंदोई हितेंद्र भगवान आसवाल सर्व रा. नेहरू नगर जळगाव यांनी गांजपाठ केला. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता यावल येथे माहेरी निघून आल्यात. यावल पोलीसात धाव घेवून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात पती भुषण फुसे, यशवंत फुसे, सासु सुमित्रा फुसे, ननंद पुनम असवाल आणि नंदोई हितेंद्र आसवाल यांच्याविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.