जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरिविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेला हुंड्यांच्या पैश्यांसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पतीसह इतर पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या शुभांगी दीपक सोनवणे (वय-२२) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील लिधुर दीपक तानकु सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती दीपक सोनवणे याने विवाहितेला हुंड्याच्या पैशासाठी छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला शिवीगाळ करणे, टोमणे मारणे, मानसिक त्रास देणे व मारहाण करणे सुरू झाले. तर सासू, सासरे, दिर आणि एक जण अशा चौघांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगावातील हरीविठ्ठल येथील माहेरी निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेने ९ मार्च रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती दीपक तानकू सोनवणे, सासु प्रमिला तानकू सोनवणे, सासरे तानकू गोविंदा सोनवणे, दीर मनोज तानकू सोनवणे आणि खटूबाई (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. लिधूर ता.जि.जळगाव यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहे.