हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हुंडा दिला नाही तो माहेरुन घेवुन ये असे म्हणून जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माहेर असलेल्या यास्मिन आसिफ शहा यांचा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील आसिफ शहा यांच्याशी विवाह झाला. पतीसह सासरच्यांनी वेळोवेळी विवाहिता यास्मिनचा हुंडा दिला नाही म्हणुन शिवीगाळ व मारहाण करत मानसिक व शारीरिक छळ केला. छळाला कंटाळून विवाहित माहेरी निघून आले याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती आसिफ हनीफ शहा रा.शाहदा नंदुरबार,  शहनाजबी हानिफ शहा , हानिफ शहा आयुब शहा, नसीमबी निसार शहा व निसार शहा चौघे रा. शहादा दोंडाईचा या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली सोनवणे करीत आहेत.

Protected Content