जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संसारोपयोगी वस्तूंसह दागिने घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, “शहरातील गेंदालाल मिल परिसरातील माहेर असलेल्या समिना असरार खान (वय-३२) यांचे बागमल रोडजवळ हाजी मसजीद बाला कम्पाऊंड भिवंडी येथील असरार इसलांम खान यांच्यासोबत विवाह झाला होता. सासरच्या मंडळींकडून विवाहीतेला वॉशिंग मशिन, फ्रीज, सोन्याचे कानातले व रोख रक्कम ५० हजारांसाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. तसेच विवाहितेला शिवीगाळ करुन तीला जीवंत मारुन टाकण्याची धमकी देखील देण्यात आली.
हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन पती असरार इसलांम खान, फरजाणा बी सय्यद, दीर इमरान खान शेर, नणंद सखीना मुस्कान सैय्यद, साखरा मुस्ताक सैय्यद रा. भिवंडी यांच्याविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.