Home क्राईम सावखेडा सिम येथे विवाहितेचा विनयभंग ; आरोपी फरार

सावखेडा सिम येथे विवाहितेचा विनयभंग ; आरोपी फरार

0
19


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम या गावातील एका विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना ८ दिवसांपूर्वी घडली असून याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, दि.२१ मार्च रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घरात एकटी असल्याचे पाहुन आमच्या घरासमोर राहणारा संशयीत आरोपी अल्लाउद्दीन दगेखा तडवी हा महीलेच्या कुटुंबातील मंडळी शेतीकामासाठी गेले असता सदर महीला ही घरात झोपली होती. विवाहितेला लज्जा वाटेल असे कृत्त केले. दि.२२ मार्च रोजी माझे पती हे सकाळी शेतकामावरून आल्यावर मी घडलेला प्रकार पतीस सांगीतले, माझे पती यांनी त्यास घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता अल्लाउद्दीन तडवी हा काही एक न बोलता घरातुन निघुन गेला असुन तो अद्यापपर्यंत घरी परत न आल्याने अखेर आज दि.३१ मार्च रोजी त्या२० वर्षीय महीलेच्या तक्रारीवरून संशयीताच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.


Protected Content

Play sound