Home Cities जळगाव डॉ. प्रियंका रेड्डींच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मोर्चातून मागणी (व्हिडीओ)

डॉ. प्रियंका रेड्डींच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मोर्चातून मागणी (व्हिडीओ)

0
27


जळगाव प्रतिनिधी । हैदराबाद येथील पशुचिकीत्सक डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करणार्‍यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील पशुचिकित्सकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

डॉ. प्रियंका रेड्डी या पशुवैद्यकीय अधिकारी होत्या. त्यांच्या मृत्यूने देशभरात प्रचंड खळबळ उडाली असून त्यांच्या मारेकर्‍यांचा सर्वत्र निषेध होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज जिल्हा पशुचिकित्सक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालावर मूक मोर्चा काढण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मारेकर्‍यांना त्वरीत फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

पहा या मोर्चाची क्षणचित्रे दर्शविणारे लाईव्ह कव्हरेजचे व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/556640924894215

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/732815350542878


Protected Content

Play sound