गरुड विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात संपन्न

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केल्या जातो. कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून गरुड विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून जेष्ठ शिक्षक पी जी पाटील लाभले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला.कार्यक्रमांमध्ये पुढे शाळेच्या मराठी शिक्षक एल पी मोहने कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली. आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले.यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले वक्तृत्व केले.त्यांची वक्तृत्वाची कला पाहून संपूर्ण सभा मंडप भारावून गेला होता. मराठी भाषा ही आपली माता आहे. मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न  करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे असे संदेश दिला. व तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची किर्ति जगामध्ये दुरवर पसरली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा या दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्व यावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित करण्यात आले होते.स्पर्धेमध्ये सर्वोत्तम स्पर्धकाला मंचावरील मान्यवर द्वारे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सिद्धिका मधुसूदन गरुड ,कावेरी सोपान बारी, योगिनी योगेश काळे, पूर्वा काबरा, ऐश्वर्या गरुड, सिद्धी रावणे, प्राची कासार, सुमित कोथळकर ,पायल सोनवणे ,ललित भारुडे ,गायत्री उशीर, रेणुका बारी या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार उपमुख्याध्यापक ठोके ज्येष्ठ शिक्षक पी.जी.पाटील, डी. बी.पाटील,पी.के.चौधरी,डी.एच.बारी, एल.पी.मोहने, जी.टी.कुमावत इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक डी बी पाटील यांनी आभार मानले.

Protected Content