Home Cities जामनेर जामनेर येथे शिक्षक दिनानिमित्त मराठी पुस्तक प्रदर्शन

जामनेर येथे शिक्षक दिनानिमित्त मराठी पुस्तक प्रदर्शन

0
88


worl

जामनेर प्रतिनिधी । शहरात शिक्षक दिनानिमित्त भव्य मराठी पुस्तक प्रदर्शन दि. 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत भरविण्यात येत असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अशी असणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या कार्यक्रमाचे आयोजक संदीप गायकवाड, कृष्णा तपोने, गणेश राऊत, शंकर गायकवाड, विजय सुर्यवंशी, रूपेश बिऱ्हाडे यांनी केले आहे. या प्रदर्शनात पाचशेहून अधिक विविध विषयांची पुस्तके, कथा, कादंबरी, बाल वाङ्मय, ग्रामीण वाङ्मय अनुवादित, पाकशास्त्र, योगविषय, व्यक्तिमत्व विषयक, ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. कोणत्याही
पुस्तकाचे मूल्य फक्त 70 रुपये ठेवण्यात आले आहे. प्रदर्शन कालावधी दिनांक 5 ते 9 सप्टेंबर 2019 असा असून वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ठेवण्यात आली आहे. पुस्तक प्रदर्शन स्थळ जि.प.केंद्र शाळा वाकी रोड जामनेर असे आहे. सर्व पुस्तक वाचक प्रेमी, सुज्ञ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound