पाचोरा प्रतिनिधी । येथे मराठा मावळा संघटनेतर्फे मध्यरात्री शिवजन्माचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दीप प्रज्वलन करून शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या चौकात मध्यरात्री पोवाडे व देशभक्तीपण गाण्यांच्या गजरात झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या उधळून शिवजन्माचे स्वागत करण्यात आले. आज दिवसभर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे संपूर्ण शहरात भगवे झेंडे लावून लायटिंग रोषणाई व फुलाची झंझावात करण्यात आले या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची माहितीदेखील येथे देण्यात आली आहे. एक व्यक्ती एक पणती लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रकाशासाठी हा उपक्रम वीर मराठा मावळा संघटना शंभुराजे ग्रुप यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. याप्रसंगी शहिदांना आदरांजलीदेखील अर्पण करण्यात आली.
पहा– मराठा मावळा संघटनेतर्फे शिवजन्म सोहळ्याचे करण्यात आलेले स्वागत !