पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील गेल्या सहा वर्षापासून बाजारपेठलगत ग्राहकांसह रहिवाशी धारकांना आपल्या आईच्या स्मृतींना उजाळा देत मराठे परिवार मोफत जलसेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे स्थानिक व्यापारी व रहिवाशी धारकांनी कौतुक केले आहे. पारोळा मराठे परिवार गेल्या चाळीस-पन्नास वर्षापासून व्यावसायिक क्षेत्रात आशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असते. मातोश्री स्व. डॉक्टर आशाबाई मराठे यांच्या स्मृतींना उजाळा देत शहरातील तलाव गल्ली परिसरात शिव दरवाजा जवळ भूपेंद्र मराठे व बापू मराठे या भावंडांनी मोफत जलसेवा देऊन ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची तहान भागवली आहे.
जलसेवा ही रहदारीच्या मार्गाने असल्यामुळे दररोज शेकडो नागरिक या जल सेवेचा लाभ घेत तृप्त होत असतात. दरम्यान गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्व. डॉ. आशाबाई मराठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुन्हा जल सेवेला यावर्षी सुरुवात करण्यात आली. यावेळी आशा परिवाराचे अध्यक्ष भूपेंद्र मराठे सह बापू मराठे, प्रतीक मराठे, भुजंगराव मराठे, धनंजय मराठे ,शशांक मराठे, रामदास पाटील, यांच्यासह आशा परिवाराचे सदस्य व स्थानिक व्यापारी उपस्थित होते. दरम्यान संत गाडगे महाराज यांच्या भुकेल्याला अन्न तहानलेल्या पाणी या म्हणीच प्रमाणे मराठे परिवार
जल सेवेच्या माध्यमातून परोपकारी भावना जोपासत असल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळें शहरालगत ठिकठिकाणी जलसेवा सुरू झाल्या तर निश्चितपणे गरजूंना याचा लाभ होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.मोफत जलसेवेच्या शुभारंभ प्रसंगी बापू मराठे, धनंजय मराठे सह स्थानिक व्यापारी यांच्या हस्ते करण्यात आले.