मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आधीच्या सरकारने सुरू केलेल्या काही योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आधीच्या सरकारच्या अनेक योजना या बंद होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात पहिल्या बैठकीत आरे कारशेडबाबत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवण्यात आला असून हीच बाब आता अन्य योजनांच्या बाबतीत देखील घडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या सरकारने अनेक शासकीय योजना राबविल्या. यात आदित्य ठाकरे यांच्या माझी वसुंधरा या योजनेला मोठ्या प्रमाणात निधी प्रदान करण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कामांना प्राधान्य दिले होते. या योजनेला शिंदे सरकार हे कात्री लावण्याची शक्यता आहे. तूर्तास शिवभोजन थाळीसारख्या योजना वगळता आधीच्या सरकारच्या बर्याचशा योजना आता बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.