मुंबई (वृत्तसंस्था) आठवड्याभरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे ननविर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला आहे. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान,त्यांनी संबंधित आमदारांची नावं सांगणे मात्र टाळले.
सोलापुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देणार हे निश्चित आहे. पण आताच जर नावं सांगितली तर सगळी मजा संपेल. त्यामुळे ही नावं सध्या तरी गुलदस्त्यात राहू द्या, असे सांगताना येणाऱ्या आठवड्यात सगळं स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.