Home Cities जामनेर पळासखेडे बुद्रुकमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

पळासखेडे बुद्रुकमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

0
48

pravesh

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण व जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील सपकाळ, भागवत साबळे, विनोद शेळके, संभाजी साबळे, मनोज तिजारे, पंकज आहिर, अक्षय जाधव, कृष्णा सोनवणे, प्रमोद शेळके, अनिल सुर्यवंशी, राजेंद्र पांगुळ, आकाश टप, चेतन शेळके, अमोल सपाटे, राजेंद्र सोनवणे, निलेश सपाटे, दिपक जाधव, अविनाश शिंदे, सनी पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम निकम, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, कमलाकर पाटील, एल.ओ.पाटील, विकास पाटील, जयंत पाटील, हेमंत पाटील, कृष्णा साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound