यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगरदे या गावात मागील आठ दिवसात अज्ञात आजाराने तीन चिमकुल्या बालिकांचा मृत्यु झाला असुन या संपुर्ण परीस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील तहसीलदार आर.के.पवार यांना दिलेल्या एका निवेदनाव्दारे केली आहे.
या संदर्भात मनसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील डोंगरदे या गावात १९ ते २१ मार्च दरम्यान हेमराज जेलु पावरा यांची महीने वयाची मुलगी अचानक आजारी पडुन मरण पावली, जितु पावरा यांचा सहा महीने वयाचा नुलागा चेतन पावरा याचा देखील अज्ञात आजाराने मृत्यु झाला. त्याचप्रमाणे सुकलाल पावरा यांच्या सात महीन्याच्या गौरव पावरा या मुलाचाही अज्ञात आजाराने मृत्यु झाला. अन्य १५ लहान मुलांची प्रकृतीही गंभीर असल्याने संपुर्ण आरोग्य यंत्रणाही डोंगरदे गावात तळ ठोकुन आहे.
या संदर्भात शासनाने दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केल्यावर डोंगरदे येथे दुष्काळ असतांनाही पंचायत समिती व इतर प्रशासकीय यंत्रणेने या आदीवासी गावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. संपुर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने गावातील एक मात्र अत्यल्प व दुषीत पाणी असलेल्या विहीरीतुन पाणी पियावे लागल्याने या दुषीत पाण्यामुळेच अतिसार, अज्ञात व्हायरल आजाराने या तीन निष्पाप चिमकुल्यांचा मृत्यु झाला व संपुर्ण डोंगरदे गावावर विविध आजाराचे संकट ओढवले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा, शासकीय पातळीवर अशी दक्षता न घेणारे यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, यावल तालुका आरोग्य विभाग आणि डोंगर कठोरा तालुका ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्यावर आठ दिवसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेतल्यास पक्षाच्या माध्यमातुन तीव्र आंदोलन छेडण्यात येइल, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. या निवेदनावर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे यावल तालुका सचिव संजय नन्नवरे, शहराध्यक्ष चेतन अढळकर, संतोष जावरे, आबीद कच्छी, अकील खान, ईसहाक मोमीन, ईस्माईल खाव, आरीफ खान, यांच्या स्वाक्षर्या आहेत.