पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माणसाची वेळ आणि काळ हि ठरलेली असते असे प्रतिपादन जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी आत्मसन्मान फाउंडेशन संचलित मनोरुग्ण निवासी पुनर्वसन प्रकल्प बोदवड येथे वडीलांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मनोरुग्णांना सकाळचे जेवण तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने 12 महिला रुग्णांना कपडे (गाऊन) वाटप तसेच संपादित केलेले माय, बाप तसेच स्वलिखीत चारोळी काव्यसंग्रह किलबिल पुस्तके वाटप करतांनाच्या वेळी सांगितले.
रुग्णांसमोर बोलतांना त्यांनी सांगितले की, ज्या वेळेस माणसाचा जन्म घातलेला असतो त्यामध्ये माणसाची वेळ आणि काळ ही ठरलेला असते. त्या वेळचालीनुसार परमेश्वर हा आपल्याला ठेवत असतो. सर्व काही त्याच्या हातात आहे. मनोरुग्ण किंवा निराधार लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असतो. समाजात अशी काही ठराविक माणसे आहेत की अश्या मनोरुग्ण किंवा निराधार लोकांविषयी काळजी वाटते आणि अश्या वेळी मदतीचा हात पुढे करत असतात. दानशूर व्यक्तींमुळे त्यांना हातभार लागतो. यावेळी आत्मसन्मान फाउंडेशनचे व्यवस्थापक वासुदेव साखरे, बोदवड कृषीउत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव राजेश काळबैले, सेवेकरी रविंद्र माळी, आकाश बावस्कर तसेच स्वयंपाकी श्रीमती मनीषा भगत इत्यादी उपस्थित होते. प्रास्तविक व सुत्रसंचलन वासुदेव साखरे यांनी केले व आभार मानले.