यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आसराबारी येतील कुपोषीत आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या अॅड. नंदिनी अनिल चौधरी यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी या कुटुंबाला धीर दिला आहे.
या प्रसंगी ॲड. नंदीनी चौधरी यांनी आदीवासी वस्तीवर जावुन त्यांना धीर देण्यासाठी ॲडव्होकेट नंदिनी चौधरी प्रयत्न करत आहे. दरम्यान मयत कुपोषग्रस्त बालकाच्या कुटुंबास न्याय मिळावा, याकरीता त्यांनी जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत तातडीने मदत व्हावी. यासाठी प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची ॲड. नंदिनी चौधरी यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान यावल तालुक्यातील आदीवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांसह तालुक्यातील कुपोषणग्रस्तांच्या एकुण संख्याबाबत सखोल माहीती घेतली. आपल्या कार्यालयाच्या माध्यमातुन युद्धपातळीवर योग्यती पाऊले उचलुन कुपोषणग्रस्तांसाठी तात्काळ योग्य ती शासकीय पातळीवर मदत करावी अशा सुचना महीला व बालविकास प्रकल्पच्या अधिकारी अर्चना आटोळे यांना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्या सोबत प्रहार पक्षाचे राजु शेख , सागर चौधरी , राहुल कचरे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.