मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज २९ ऑगस्ट गुरुवार रोजी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली आणि धडा शिकवण्याचा निर्धार केला. यावेळी जरांगे म्हणाले की, सरकारने 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मी २९ सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन. ही आरपारची लढाई आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच आहे.

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने झालेल्या एका छोटेखानी बैठकीत मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी अचानक मराठा आरक्षणासाठी २९ सप्टेंबरपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. आपल्याला काही झाले तरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. एक मेल्याने काही फरक पडत नाही. काळजी करू नका. माझे एक कुटुंब उघडे पडले तरी चालेल, पण समाजाचे लाखो कुटुंब मोठे झाले पाहिजेत. आपले उपोषण २९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होईल.

Protected Content