चंदीगड वृत्तसंस्था । शेतकरी आंदोलनाचा आपल्या पक्षाला फटका बसू शकतो असे दिसून आल्याने दुष्यंत चौटाला यांचा पक्ष भाजपचा पाठींबा काढून घेण्याच्या विचारात असल्याने तेथील मनोहरलाल खट्टर यांचा सरकार संकटात आल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी आंदोलन चिघळल्याचे राजकीय पडसाद हरियाणात उमटण्याची शक्यता दिसून येत आहे. या संदर्भात इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार जेजेपी पक्ष भाजपचा पाठींबा काढण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये जेजेपीचे १० आमदार आहेत. हरियाणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. ९० जागा असलेल्या या विधानसभेत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. यामुळे जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपाचे मनोहरलाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. आता मात्र पाठींबा काढल्यास सरकार संकटात येणार आहे.
उपमुख्यमंत्री दुष्यंच चौटाला यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बैठक झाली. यात अनेक आमदारांनी सरकारचा पाठींबा काढण्याची सूचना केल्याने खट्टर सरकार धोक्यात असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, ही शक्यता लक्षात घेऊन भाजप देखील सतर्क झाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.