Home राजकीय मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार


पणजी (वृत्तसंस्था) गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी ५ वाजता पणजीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी ११ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत पणजीच्या कला अकादमीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनाठी ठेवण्यात येणार आहे.

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात पोहोचले असून सुमारे तासभर त्यांचे पार्थिव मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून मुख्यालय परिसरात शोकाकूल वातावरण आहे. दरम्यान, अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी गोव्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound