

नंदुरबार (वृत्तसंस्था) नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. सलग ९ वेळेस कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक जिंकणारे गावित हे आपल्या मुलाला उमेदवारी न दिल्यामुळे नाराज आहेत.

माणिकराव गावित यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले. पुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने माणिकराव नाराज आहेत. 30 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात अपक्ष उभे राहायचे की भाजपला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेणार असल्याचे माणिकराव गावित यांनी सांगितले. नंदुरबारमध्ये भाजपने विद्यमान खासदार हीना गावित यांना पुन्हा संधी दिली आहे, तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात के. सी. पाडवी यांना रिंगणात उतरवले आहे. मुलाला तिकीट देण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे माणिकराव बंडाच्या तयारीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील बडं प्रस्थ असलेल्या माणिकराव गावितांच्या बंडाळीचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो.


