पारोळा प्रतिनिधी । येथील उपनगराध्यक्षपदी बांधकाम सभापती मंगेश तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार ए. बी. गवांदे, तर सहायक म्हणून मुख्याधिकारी सचिन माने यांची उपस्थिती होती. या पदासाठी शिवसेनेचे दीपक अनुष्ठान व मंगेश तांबे यांचे अर्ज दाखल झाले होते. परंतु दीपक अनुष्ठान यांनी माघार घेतल्याने मंगेश तांबे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी नगराध्यक्ष करण पवार, माजी उपनगराध्यक्ष कैलास चौधरी यांनी त्यांचे स्वागत सत्कार केला. याप्रसंगी नगराध्यक्ष करण पवार, उपनगराध्यक्ष कैलास चौधरी यांच्यासह स्वीकृत सदस्य पी. जी. पाटील, शहर विकास आघाडीचे नगरसेवक प्रकाश महाजन, अशोक चौधरी, मनीष पाटील, गटनेत्या वंदना शिरोळे, सुनंदा वाणी, माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, अॅड. तुषार पाटील, सुधाकर पाटील, अरुण चौधरी, संजय चौधरी, प्रा. राजेश पाटील, संजय पाटील, अमृत चौधरी, प्रकाश वाणी, हितेश पाठक, एस. बी. मोहरीर, राहुल नांदेडकर, बाबा उपासनी, गजेंद्र कुलकर्णी, गणेश बारी उपस्थित होते. निवड घोषीत झाल्यानंतर मंगेश तांबे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.