Home करियर मंगेश निळे यांची ‘इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड’साठी निवड ; मुंबईत होणार गौरव

मंगेश निळे यांची ‘इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड’साठी निवड ; मुंबईत होणार गौरव


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील श्री समर्थ सायन्स क्लासेस (निळे कोचिंग अकॅडमी) चे समन्वयक शिक्षक मंगेश जगन्नाथ निळे यांची ‘इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड’साठी निवड झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्पर्धात्मक तयारी निर्माण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबई येथील डॉ. होमी भाभा फाउंडेशनतर्फे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. होमी भाभा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘AYSA – Aspiring Young Scientist Award Ceremony 2025-2026’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 12 मे 2026 रोजी मुंबई येथे होणाऱ्या या भव्य सोहळ्यात मंगेश निळे यांना ‘इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सातत्याने विविध राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी MSAT (Mathematics & Science Ability Test), GREAT (General Reasoning English Aptitude Test) तसेच RoboQuest यांसारख्या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळाल्याचे फाउंडेशनने नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि नवोन्मेषाची भावना निर्माण करण्यासाठी मंगेश निळे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करण्याचे काम त्यांनी केले असून त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत फाउंडेशनकडून त्यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे मुक्ताईनगर शहरासह परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक संस्थांकडून मंगेश निळे यांचे अभिनंदन करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते याचे हे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

मंगेश निळे यांच्या या निवडीमुळे मुक्ताईनगरच्या शैक्षणिक क्षेत्राला एक नवी ओळख मिळाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रगतीची नवी संधी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound