चाळीसगाव प्रतिनिधी । मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित एकदंत गणेश महोत्सवात आज खानदेशातील प्रसिद्ध अशा डोंगर हिरवा गार ग्रुपच्या माध्यमातून कानबाई मातेचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कानुबाई म्हणजे खानदेशातील आराध्य दैवत आणि याच कानूबाईच्या नावाने खानदेश ओळखला जातो म्हणूनच कानबाई मातेचा जागर घालण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात डोंगरले पडी गई वाट वाट मनी कानबाई नी कसाना लाऊ मी थाट थाट मनी कानबाई ले, डोंगर हिरवा गार माय तुना डोंगर हिरवा गार, भाऊ मना सम्राट अशा खानदेशातील नावाजलेल्या गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे चाळीसगाव करांसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे. शहरातील सिताराम पैलवान मळा, लक्ष्मीनगर या ठिकाणी हा कार्यक्रम आज सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते मंगेश चव्हाण यांनी केले आहे.