Home Cities चाळीसगाव ‘वारी जनसंवादाची’ कार्यक्रमांतर्गत मंगेश चव्हाण यांच्या भेटी-गाठी

‘वारी जनसंवादाची’ कार्यक्रमांतर्गत मंगेश चव्हाण यांच्या भेटी-गाठी

0
40

vari jansanvadachi

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्याचे युवा नेते मंगेश चव्हाण हे चाळीसगाव मतदार संघातून ‘वारी जनसंवादाची’ या कार्यक्रमांतर्गत लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी दररोज तालुक्यातील वेगवेगळ्या गावात भेटी देवून लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचा धडाका लावला आहे.

 

गेल्या दोन दिवसात (दि.२८-२९) त्यांनी १० गावांना भेट देवून ग्रामस्थांशी हितगुज केले आहे. त्यांनी भेट दिलेल्या गावांमध्ये भोरस, बिलाखेड, भोरस बु|, जामडी, जावळे, वाघले, मजरे, वाकडी, वाघडू व रोकडे या गावांचा समवेश आहे. सगळीकडे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound