पायी दिंडीतील भाविकांना युवानेते मंगेश चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा (व्हीडीओ)

2db2216f 67b2 443c a047 f68d4d854841

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उंबरखेड येथून औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुतीपर्यंत पायी दिंडीने जाणाऱ्या तरुण भाविकांची आज सकाळी तालुक्याचे युवा नेते मंगेश चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व भाविकांना दिंडी निमित्त शुभेच्छा दिल्या.

 

बाल हनुमान मंदिराजवळ त्यांनी या भाविकांच्या दिंडीची आपल्या सहकार्‍यांसह भेट घेतली. यावेळी श्री. चव्हाण यांच्यासमवेत माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील निकम, रोहिणी गावाचे सरपंच अनिल नागरे व विजय कदम हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी पायी दिंडीने निघालेले तरुण भाविक राजेंद्र पाटील, अजय सूर्यवंशी, भैय्यासाहेब पाटील, योगेश वाणी, सुरा पहिलवान, शंकर पहलवान, उंबरखेड गावचे ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील व शंकर पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content