चाळीसगाव प्रतिनिधी । आजच्या डिजीटल युगात वाचन संस्कृती हरवत चालली असून तिचे जतन करण्यासाठी शहरात वाचनालायांचे लोकार्पण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन युवा नेते मंगेश चव्हाण यांनी केले. ते शहरातील वाचनालयांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, येथील युवानेते मंगेश चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त शहरात वाचनालये सुरु करण्याचा संकल्प केला होता. याच्या पूर्ततेसाठी शहरात १० ठिकाणी सार्वजनिक वाचनालयांचे लोकार्पण करण्यात आले. यांच्या अंतर्गत आदर्श टी हाऊस, स्टेशन रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय; रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय; नवीन हिरापूर नाका आदर्श नगरातस्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय; हिरापूर रोड, रुद्र हनुमान नगरात रुद्र हनुमान सार्वजनिक वाचनालय; पाटणादेवी रोड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय; शिवाजी घाट येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय; चाळीसगाव स्टेशन रोड, तहसील कचेरी समोर वीर सावरकर सार्वजनिक वाचनालय; खरजई नाका, भडगाव रोड येथे महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय; बस स्टँड परिसरातधर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय तर के.आर.कोतकर कॉलेज समोर, धुळे रोड येथे नरेश महाराणा प्रताप सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी मंगेश चव्हाण यांनी वाचन संस्कृतीला जतन करण्यासाठी वाचनालयांचे लोकार्पण करण्यात आल्याचे प्रतिपादन केले. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.