दुध संघ चेअरमनपदाची १८ रोजी निवड : आ. मंगेश चव्हाणांचा तगडा दावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघाच्या नवनिर्वाचीत संचालकांनी १८ रोजी पहिली बैठक होणार असून यात चेअरमनपदाची निवड होणार आहे.

नुकतीच जिल्हा दुध संघाची निवडणूक पार पडली. यात भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी मिळून शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातू निवडणूक लढविली. तर त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे सहकार पॅनल रिंगणात होते. या अत्यंत चुरशीच्या लढाईत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली. यात अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांनी मावळत्या चेअरमन मंदाताई खडसे यांना पराभूत केले. यामुळे ते या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

दरम्यान, रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी नवनिर्वाचीत संचालकांची बैठक पार पडणार आहे. यात नवीन चेअरमनपदाची निवड होणार आहे. या पदासाठी अनेक संचालक हे स्पर्धेत असले तरी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे दुध संघाची धुरा येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ऐन वेळेस धक्कातंत्राचा वापर करून दुसरे नाव समोर येण्याची शक्यता देखील असली तरी या पदासाठी मंगेश चव्हाण यांचा तगडा दावा असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content