चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या फरकाच्या मताधिक्याने विजय मिळवून उन्मेश पाटील यांचा पराभूत केले आहे. मंत्री मंगेश चव्हाण हे ८५ हजार ६५३ च्या फरकाने ते विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख ५७ हजार १०१ मते मिळवून विजयी झाले आहे.
चाळीसगाव विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख दोन मातब्बर नेते मंगेश चव्हाण आणि उन्मेश पाटील यांच्यासह इतर पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी प्रचार सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेच्या झालेल्या मतमोजणीत मंगेश चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या २५व्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. तर त्यांनी विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचा सुपडा साफ करत मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. यात मंगेश चव्हाण यांना १ लाख ५७ हजार १०१ तर महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना ७१ हजार ४४८ मते मिळाली. सकाळपासून सुरू असलेल्या या मतमोजणीत दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हात येऊन मंत्री गिरीश महाजन हे विजय झाल्याचे घोषित करण्यात आले.