गोरगरिबांचे कैवारी मंगेश चव्हाण यांना मिळतोय लोकांचा भरभरून आशीर्वाद ! (व्हिडीओ)

netra shibir

चाळीसगाव, विशेष प्रतिनिधी | तालुक्यातील युवा नेते मंगेश चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या मित्र मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातल्या गोरगरीब वंचित जनतेची ज्याप्रकारे सेवा चालवली आहे. त्यामुळे लोकांकडून त्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. जनतेच्या या आशीर्वादांच्या पाठबळावर आपण कुठलीही मोठी जबाबदारी सहज खांद्यावर घेवून पार पडून दाखवू शकतो, असा आत्मविश्वास आता मंगेश चव्हाण यांना वाटू लागला आहे. याच भावनेतून त्यांनी अधिक तन्मयतेने जनतेच्या समस्या सोडवण्याकामी स्वत:ला झोकून दिल्याचे दिसून येत आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून मंगेश चव्हाण हे सातत्याने चाळीसगाव शहर व तालुक्यातील जनतेच्या हितासाठी अखंड समाजसेवेचे व्रत घेवून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘जे बोलेल ते करणारा आणि अर्ध्या रात्री लोकांच्या मदतीला धावून जाणारा एक परोपकारी तरुण नेता’ अशी त्यांची प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे. शीत शवपेट्या वाटणे असो, नेत्र तपासणी शिबीर असो, शालेय मुलांना साहित्य वाटप असो, कुणाच्या गंभीर आजारात धावून जावून सर्वतोपरी मदत करणे असो, तालुक्यातील जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होणे असो, गोरगरिबांचे अश्रू पुसण्यात ते कधीच मागे रहात नाहीत.

त्यांची मदत करण्याची तळमळ आणि लोकांसाठीची संवेदना बघून आता तर तालुक्यातील लोकांना त्यांच्याबद्दल एवढा विश्वास वाटू लागला आहे की, आपल्या सगळ्या अडचणी ते हक्काने त्यांना आणि त्यांच्या मित्रमंडळींना सांगू लागले आहेत. मंगेश दादाही कुठलीही उपकार करीत असल्याची भावना न बाळगता त्यांना मदत करताना दिसतात. खेडोपाड्यातील गरिबीने खचलेल्या दिनदुबळ्या लोकांना त्यांचा आता आधार वाटू लागला आहे. या बाया-बापड्या, माता-भगिनींचे आणि हताश झालेल्या वृद्ध व्यक्तींचे काम करताना मंगेशदादा ज्या उत्साहाने स्वत:ला झोकून देतात, ते बघून उपस्थित लोकही चकित होत असतात. मंगेश चव्हाण यांची समाजसेवेची ही उर्मी बघता, शहर आणि तालुक्यातील जनता त्यांना भरभरून आशीर्वाद देत असून त्यांच्यासाठी प्रगतीची कामना करताना दिसत आहे. एखाद्या तरुण उमद्या नेत्याला जनतेकडून आणखी कोणत्या अपेक्षा असू शकतात.

 

 

Protected Content