चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज (दि.११) तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचार फेरी काढण्यात आली आहे. या दौऱ्याची सुरुवात सकाळी कोदगाव येथून होवून बेलदारवाडी, गणपूर गाव व तांडा, शामवाडी, चितेगाव, पिंप्री बु प्र.चा., गणेशपुर, शिंदी, विष्णूनगर, खडकी बु., तांबोळे बु. आणि खु., खरजई व तरवाडे या गावातून ते मतदारांच्या गाठी-भेटी घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी बहाळ येथे गट मेळावा घेण्यात येणार आहे.
यावेळी खासदार उन्मेश पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, जि.प. सभापती पोपट तात्या भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, पं.स. सभापती सौ. स्मितल दिनेश बोरसे, उपसभापती संजू तात्या पाटील, विधानसभा प्रचार दौराप्रमुख दिनेश बोरसे, जि.प. सदस्या सौ.मंगलाताई जाधव, तालुका सरचिटणीस तथा गटप्रमुख धनंजय मांडोळे,पं.स. सदस्य सुनील पाटील, पं.स.सदस्य सौ.वंदना दत्तू मोरे, माजी पं.स. सदस्य जगन्नाथ महाजन, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, माजी पं.स. उपसभापती बाळासाहेब राऊत, मार्केट कमिटी संचालक मच्छिंद्र राठोड, संचालक किशोर पाटील, तालुका चिटणीस तथा गणप्रमुख डॉ.रविंद्र मराठे, गणप्रमुख दिनकर राठोड व उमेश आव्हाड तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सर्व गावातील, गणातील, गटातील समस्त गट प्रमुख, गण प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी चेरमन, संचालक, नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील तालुका व जिल्हा युवामोर्चा, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी तसेच मित्र पक्ष शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप, शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.