Home Cities जळगाव मांगल्य’ वधू-वर सूचक केंद्राचा राज्यव्यापी परिचय मेळावा

मांगल्य’ वधू-वर सूचक केंद्राचा राज्यव्यापी परिचय मेळावा

0
152

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनगर समाजातील युवक-युवतींसाठी मागील चोवीस वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या “मांगल्य” वधू-वर सूचक केंद्र, जळगाव यांच्या वतीने यंदाचा 30 वा राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा रविवारी 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या 24 वर्षांत या केंद्राच्या माध्यमातून धनगर समाजातील सर्व शाखांतील 2000 पेक्षा अधिक विवाह यशस्वीपणे जुळविण्यात आले आहेत. समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना एकत्र येण्यासाठी आणि योग्य जोडीदार शोधण्यासाठी “मांगल्य” केंद्राचे योगदान विशेष मानले जाते. समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींना एकत्र आणून हे केंद्र वैवाहिक समरसतेचा आदर्श ठरले आहे.

या मेळाव्याच्या दिवशी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या पुस्तिकेत विवाहयोग्य युवक-युवतींची संपूर्ण माहिती, छायाचित्रांसह प्रकाशित केली जाईल. या पुस्तिकेमध्ये समावेशासाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नावनोंदणी करता येईल. इच्छुकांनी संचालिका रेखा न्हाळदे आणि संचालक प्रभाकर न्हाळदे यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

या उपक्रमाला जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष दिलीप धनगर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश बागुल, अहिल्या महिला संघाच्या अध्यक्षा प्रमिला कंखरे तसेच जळगाव जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने सहकार्य लाभत आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मेळावा अधिक यशस्वी आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound