अमळनेर प्रतिनिधी। येथील मंगळग्रह मंदिरावर भारतीय पोस्टाच्या सहकार्याने विशेष पाकीट काढण्यात आले असून याचे विमोचन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर औरंगाबाद विभागाचे पोस्टमास्टर व्हि. एस. जयशंकर, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, डाक अधीक्षक जळगावचे आर. बी. रनाळकर आदींची उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केला. आर. बी. रनाळकर यांनी सांगितले की मंगळ ग्रह मंदिर अमळनेर येथे पाकीट विमोचन सोहळा म्हणजे संस्थेचे श्रमाचे परिपाक, सेवाभावी संस्थेचे मेहनतीचे फळ आहे. डीवायएसपी राजेंद्र ससाणे म्हणाले की, मंगळग्रह मंदिराच्या आजुबाजुचा परिसर पाहून मनाला खूप शांती व समाधान वाटले मंगळग्रह मंदिरातील नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे व संस्थेचे व संस्थेच्या संचालकांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे मंगळ ग्रह मंदिराच्या जीर्णोद्धाराला ९० वर्षे पूर्ण झाली असली तरी पोस्टाच्या सहकार्यांनी पाकीट विमोचन सोहळा ही एक भाग्याची गोष्ट आहे असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी प्रस्ताविक इथून मंगळ ग्रह मंदिरात वर्षभरात राबविणार्या उपक्रमाची माहिती देऊन भविष्यकाळातील उपक्रमाचे नियोजनाचा आढावा सांगितला. त्यांनी मंदिराच्या विकास कामात ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनस्वी आभार मानले. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना औरंगाबाद विभागाचे पोस्टमास्टर व्हि.एस. जयशंकर म्हणाले की, श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या निमित्ताने अशा प्रकारचे पाकीट खान्देशात प्रथमच जारी होत असून हे मंदिर प्रथम मानकरी ठरले आहे.
श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे ज्वाज्वल्य, तेथील स्वच्छता, भाविकांना मिळणार्या सोयी-सुविधा ,पारदर्शकता , सामाजिक जाणिवेचे उचीत भान यामुळे या मंदिराची ख्याती देशातील कानाकोपर्या पर्यंतच नव्हे तर परदेशातही सोशल मिडियामुळे पोहोचली आहे. राज्यातील बोटावर मोजण्याइतकीच मंदिरे आयएसओ मानांकित असून या श्रेयनामावलीत या मंदिराचा समावेश आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेवर या देवस्थानाचा सुपरिणाम आता दृश्य स्वरूपात स्पष्ट पणे दिसू लागला आहे . या सर्व बाबींचा एकूणच परिपाक म्हणून पोस्ट खात्याने या मंदिराची खूप मोठी दखल घेतली आहे.पाकिटावर श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे छायाचित्र आहे प्रसिद्ध केल्यामुळे महत्त्व अधिक वाढले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बहीरम यांनी केले. आभार प्रदर्शन एस .एन पाटील यांनी केले. कार्यक्रमात डी. एस. पाटील, गणेश देशमाले, मनीष नवले, मनीष तायडे,व्हि.के. महाजन पोस्ट खात्यातील कर्मचारी व अमळनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थांचे पदाधिकारी व सेवेकरी यांनी मेहनत घेतली.
पहा : या कार्यक्रमाचा व्हिडीओ.