जामनेर (प्रतिनिधी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी ढोल ताशांच्या गजरात यानी ठेका धरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जामनेर येथे सजविलेल्या ट्रॅक्टरवर त्यांची प्रतिमा ठेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत आबालवृद्धांनी सहभाग घेतला.
दरम्यान, काही काळ या ट्रॅक्टरचे सारथ्य हे ना. महाजन यांनी केले. ना. महाजन यांनी मिरवणुकीत भीम गीतांवर ठेका धरला तसेच लेझीम देखील खेळले. मिरवणुकीत घोड्यावर स्वार झालेल्या चिमुरडीसोबत ना. महाजन यांनी सेल्फी घेतला. मिरवणुकीतील शिस्तबद्ध लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.