शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) असल्याने आणि त्यात गुरुवारचा योग विदर्भाचा प्रति पंढरपूर असलेला संतनगरी शेगावात जे भाविक विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरपुरात जाऊ शकत नाही ते संतनगरी शेगाव मध्ये येऊन दर्शन घेतात.
विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील, संत नगरी शेगाव येथे कार्तिकी एकादशीनिमित्त हजारो भाविक, आज शेगावात दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त दिवाळीनंतर दरवर्षी पंढरपूरला, विठ्ठलाच्या दर्शनाकरिता लाखो भाविक पंढरपूरला जात असतात. परंतु जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ,ते भाविक मात्र विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथे, दर्शनाकरता येतात. .
आज सकाळपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनाकरिता गर्दी केली आहे. सकाळी ५ वाजता काकडा आरती झाली, तर सात वाजता मुख्य आरती झाली असून, दुपारी श्रीचां रजत मुखवटा पालखी सोहळा, व नगर परिक्रमा होणार आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या समाधी दर्शनासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत असून,मुखदर्शनाकरिता वीस मिनिटांचा वेळ लागत आहे.
एकंदरीत संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री संत गजानन महाराज व विठुरायाच्या चरणी लिहील होण्याकरिता शेगाव मध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असताना कार्तिक महिन्यात आलेला गुरुवारचा योग आणि एकादशी हे सर्वच साधून भाविक मोठ्या संख्येने श्री चे दर्शन घेत आहे.
नित्य क्रमाने श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री कलश दर्शन ,श्री श्रीमुख दर्शन ,श्री समाधी दर्शन असे दर्शन भाविकांकरता खुले आहे. भाविकांकरता सकाळी नऊ ते रात्री नऊच्या क्रमाने होणारा महाप्रसाद वितरित केल्या जात आहे.