जळगाव प्रतिनिधी । उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून महादेव मंदीराच्या ओट्यावर बसलेल्या दोन महिलांच्या अंगावर मंदीराचा स्लॅब पडल्याने गंभीर जखमी झाल्या घटना पहूर येथे दुपारी घडली. जखमी महिलांना शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर इतर दोन लहान मुले किरकोळ जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशा दिपक मोहाळे (वय-35) आणि गिता गजानन मोहाळे (वय-40) रा. वाकोद ता. जामनेर ह्या दिरानी-जेठाणी आहेत. गावातील नातेवाईक अमोल सावळे यांचे पहूरला आज लग्न होते. दुपारी साडेबारा वाजता लग्न झाल्यानंतर उन्हापासून दिलासा मिळावा या उद्देशाने गावातीलच केवळेश्वर महादेव मंदीराच्या बाहेरच्या ओट्यावर या दोन महिलांसोबत इतर सहा ते सात महिला आणि लहान मुले बसलेली होती. दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानकपणे मंदीराचा ओटावरली स्लॅबचा भाग खाली पडला. हा स्लॅब खाली बसलेल्या सुरेखा मोहाळे आणि गिता मोहाळे यांच्या डोक्यावर पडल्याने दोघे गंभीर जखमी झाल्या. सोबत असलेले दोन लहान मुलांना देखील डोक्याला किरकोळ दुखपत झाली. दोघी महिलांना रूग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.