Home Cities जळगाव जळगावात मनसेच्या जिल्हा बैठकीचे आयोजन

जळगावात मनसेच्या जिल्हा बैठकीचे आयोजन


manse logo

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या महाअधिवेशनाबाबत ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत 15 जानेवारी रोजी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाचे 23 जानेवारी रोजी आयोजन करण्यात येत आहे. या महाअधिवेशना संदर्भात नियोजन करण्यासाठी ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थिती 15 जानेवारी रोजी येथील पद्मालय विश्रामगृहात दुपारी 12 वाजता जिल्हा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी व अंगीकृत संघटना यांचे आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी सेना आजी माजी पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सचिव जमील देशपांडे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound