जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभेच्या जागेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ॲड.जमिल देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास दाखल केला. यावेळी मनसेचे नेते बाविस्कर, किरण वानखेडे, कैलास लोखंडे व ज्येष्ठ राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
कोणताही उमेदवार शहरातून वाजत गाजत शक्तिीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरतांना दिसून येते. मात्र मनसेचे उमेदवार ॲड. जमिल देशपांडे यांनी आपल्या समर्थकांसह ‘परिस्थिती प्रदर्शन’ करीत जळगाव शहरातील वास्तव काय आहे. जळगावकरांच्या प्रथा आणि वेदना या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून अनोख्या पध्दतीने जमील देशपांडे आपले नामांकन दाखल केले. शहरातील अमृत योजना, पाच वर्षात रस्त्याच्या अपघातात अनेक जण मृत्यूमुखी झाले आहे. यासाठी आमची उमेदवारी असल्याची माहिती मनसेचे उमेदवार ॲड. जमिल देशपांडे यांनी सांगितले.