जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत पतीला बँकेचे पैसे लवकर भरण्यास सांग नाहीतर पाहून घेईल अशी धमकी दिल्याची घटना रविवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कविता विकास पाटील वय ३५ या महिला आपले पती विकास पाटील यांच्या सोबत निवृत्ती नगरात वास्तव्याला आहेत. विकास पाटील यांनी बँकेचे कर्ज काढले आहे. या कर्जासाठी सुनिल देशमुख रा. श्रीराम नगर, जळगाव हे जामीन आहे. रविवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कविता पाटील या महिला घरी एकट्या होत्या, त्यावेळी सुनिल देशमुख हा महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसून तुझ्या पतीला लवकर बँकेचे कर्ज भरण्यास सांग नाहीतर त्याला पाहून घेईल अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबर भारती देशमुख हे करीत आहे.




