अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरातील मेहेतर कॉलनी परिसरात जुन्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, दोन जणांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी शाहरुख खान पठाण हे आपल्या परिसरातून जात असताना संशयित आरोपी विक्की घोगले आणि दीपक लोहरे यांनी त्यांना अडवले. ‘तू जुन्या वादात मध्यस्थी का केली?’ असे म्हणत त्यांनी शाहरुख यांना शिवीगाळ केली आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या हातावर व पाठीवर गंभीर वार केले. या हल्ल्यात शाहरुख जखमी झाले असून, अमळनेर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




